भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण
भुसावळ : पर्यावरण संवर्धनाचे महत्व लक्षात घेता भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जामनेर रोडवरीलअष्टभुजा मंदिरासमोर मंगळवारी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणप्रसंगी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, सोनू मांडे, सुधाकर बाणाईत, पांडुरंग सोनार, मनीष पाचपांडे, नारायण तांबट, यतीन पाटील आदींची उपस्थिती होती.

