यावल नगरपालिकेच्या सभेत 38 विषयांना मंजुरी


यावल : यावल पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी नगराध्यक्ष नौशाद तडवी यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. सभेत 40 पैकी 38 विषयांना मंजुरी देण्यात आली. सन 2021-22 साठी माझी वसुंधरा अभियान 2 अंतर्गत विविध कामे करण्याबाबत विचार विनिमय करणे या विषयावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी विविध कामे म्हणजे कोणती कामे ? याचा स्पष्ट उल्लेख विषयात अथवा मुख्याधिकार्‍यांच्या टिपणीतही उल्लेख नाही, मोघम विषय घेतल्याने हा विषय स्थगीत ठेवण्याची मागणी केल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली तसेच 2021-2022 साठी माझी वसुंधरा 2 अंतर्गत वृक्ष लागवड करणे कामी वन विभाग पूर्व कडून खरेदी केलेली आहेत. वित्तीयमंजूरी देण्याच्या विषयालादेखील नगरसेवक अतुल पाटील यांनी हरकत घेतल्याने हा विषय स्थगीत ठेवण्यात आला.

कामांची चौकशी करा : अतुल पाटील
माझी वसुंधरा 2 अंतर्गत यावल शहरात झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अतुल पाटील यांनी केली. गेल्या आर्थिक वर्षात 25 ते 30 लाख रुपये खर्च या योजनेवर झाला आहे. त्या कामांची चौकशी करण्यात यावी शिवाय कामे पारदर्शी झालेली नाहीत. आपल्या मर्जीतील ठेकेदारास काम मिळावे म्हणून विकासकामांचे तुकडे करुन प्रत्येकी तीन लाखाचे आत टेंडर काढून कामे करून घेतली असल्याचा आरोप अतुल पाटीलल यांनी केला आहे. सभेच्या कामकाजात प्रभारी मुख्याधिकारी विजय बडे यांना राजेंद्र गायकवाड, योगेश मदने यांनी सहकार्य केले .




मुख्याधिकार्‍यांच्या निषेधाचा ठराव
पालिकेच्या सव्वाशे वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच एखाद्या पालिका अधिकार्‍याला एसीबीच्या पथकाने अटक केल्याची घटना घडली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना 28 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक झाल्याने शहराची नाचक्की झाली असून, या घटनेस जबाबदार असणार्‍या मुख्याधिकारी बबन तडवी याचा निषेधाचा ठराव पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राकेश कोलते यांनी मांडल्याने त्यास उपस्थित सदस्यांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !