महापुरातील बाधीतांना शासनाने तत्काळ मदत द्यावी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरीक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांना सरकारतर्फे तातडीने मदत देण्यासह पुनर्वसन करावे, अशी मागणी वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करण्यात आली.
या मागण्यांचा निवेदनात समावेश
ऊस उत्पादक शेतकर्यांचे पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भात नुकसान झाल्याने तत्काळ भरपाई द्यावी, कापूस, सोयाबीन आणि डाळ व फळे आणि भाज्या उत्पादक शेतकर्यांचे नुकसानीबाबत सरकारने पिकांची जाहीर केलेली एफ.आर.पी आणि एम.एस.पी.घाऊक तसेच किरकोळ बाजारात असलेली धान्याची आणि पिकांची किंमत मूल्याधारीत करून संबंधित शेतकर्याला पिकांची आणि उत्पादनाची किंमत मदत म्हणून करावी, पूर बाधीत गावातील साचलेला गाळ आणि चिखल दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरू करावी, पुरात शेतरस्ते वाहून गेल्याने डागडुजी तातडीने सुरू करावी, ज्या लोकांची घरे अतिक्रमणात होती आणि पुरात वाहून गेली त्यांना देखील तातडीने मदत करावे, पूरग्रस्त भागांमध्ये सध्या तातडीने ताडपत्री, प्लास्टिकच्या चट्या, कोरडे कपडे, त्वचारोगावर लावण्यासाठी औषधे, लहान मुलांसाठी कपडे, सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर्स, चिखल काढण्यासाठी फावडे-झाडू ,पिण्याचे पाणी सोलार दिवे, डास चावू नये यासाठी मलमे ख अगरबत्ती या वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा, कम्युनिटी किचन सुरू करावे व पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुली थांबवावी तसेच पूरग्रस्तांची ओळखपत्र आवश्यक कागदपत्र पाण्यात बुडाल्याने सात बारा, आधार कार्ड, रेशन कार्ड, मार्कशीट व महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने ओळखपत्र देण्याची मागणी करण्यात आली.



