श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव गोगामेडी महाराष्ट्र दौर्यावर
भुसावळ : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव गोगामेडी हे शनिवार, 7 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार, प्रदेशाध्यक्ष अर्जुन भैया ठाकूर असतील. नागपूरहुन सक्काळी साडेसात वाजता ते निघतील व चांदूर रेल्वे येथे सकाळी 10.13 वाजता कार्यकर्त्यांच्या भेटी, दुपारी दिड वाजता अकोला येथे कार्यकर्त्यांच्या भेटीख, दुपारी तीन वाजता खामगावला 3 वाजता आगमन व कार्यकर्त्यांच्या भेटी, सायंकाळी सहा वाजता मलकापूर येथे आगमन व कार्यकर्त्यांच्या भेटी, सायंकाळी सात वाजता मुक्ताईनगर सत्कार व भेटी तसेच रात्री वाजता भुसावळातील नाहाटा चौफुलीवरील उड्डाणपुलाखाली सत्कार व कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी होतील. त्यानंतर जळगाव, पारोळा व पुढील नाशिककडे प्रयाण होई, असे करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंग पाटील, युवा जिल्हाध्यक्ष निखील राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.




