कोकण रेल्वे युनियन निवडणुकीत यश : भुसावळात रेल कामगार सेनेचा जल्लोष
भुसावळ : कोकण रेल्वेत रेल कामगार सेना व केआरसीईयु, एससीएसटी युतीने रेल्वे मान्यताप्राप्त युनियनच्या निवडणूकीत 924 मतांनी विजय मिळवल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी भुसावळातील रेल कामगार सेना कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी करीत पदाधिकार्यांनी जल्लोष केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्यासह मंगू शेलोडे, सुरेंद्र यादव, अरविंद थोरात, कमलाकर बाणाईत, वीरकुमार ममैय्या, प्रकाश करसाळे, भरत शर्मा, मुकेश महाजन, संजय चौधरी, निरंजन राउत, मंगेश बोरोले, मोहन राजपूत, गजानन चौधरी, शेख शकील (तम्मा पहेलवान), हाजी शेख शकील, शेख इकबाल, आनंदकुमार, मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.



