भुसावळातील 55 वर्षीय इसमाचा तापी पात्रात आढळला मृतदेह


भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीमधील रहिवासी राजकुमार मनसुधदास जेठाणी (55) यांचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात आढळला. जेठाणी यांच्या मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढून पालिका दवाखान्यात नेला. शनिवारी शवविच्छेदन केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सांगितले. रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय सोनवणे करत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !