सावद्यातील परदेशी कुटूंबियांचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले सांत्वन


जळगाव : सावदा येथील परदेशी कुटूंबातील सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकुर या आज जळगाव जिल्ह्यातील खिरोदा ता. रावेर दौर्‍यावर आल्या असता त्यांनी परदेशी कुटूंबातील सुरज परदेशी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे कुटूंबातील सुरज परदेशी यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी आणि त्यांच्या परिवारास धीर दिला व आपल्या कुटुंबाने जो समाजसेवेचा वारसा आपणास दिला आहे तो यापुढे सुरु ठेवा, आम्ही आपल्या सोबत सदैव राहू असा विश्वासही दिला. तसेच भविष्यात काही आवश्यकता भासल्यास नक्की मदत करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांचेसोबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी खा. उल्हास पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्यासह निलेश खाचणे, शाम पाटील, गणेश माळी, मनीष भंगाळे, नितीन सपकाळे, स्वप्निल परदेशी आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !