कोकण पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे साकेगावातून मदत रवाना


साकेगाव : गत महिन्यात पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात मोठा पूर आल्याने, दरड कोसळणे, अशा घटनांमध्ये असंख्य लोक मृत पावले होते शिवाय अनेक गावे उद्ध्वस्त झालले तसेच लोकांची घरे पाण्यात वाहून गेलीत, कित्येक कुटुंब रस्त्यावर आलीत. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सरकार सरकारने मदत जाहीर केली तसेच नागरीकही मदतीसाठी सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही मदतीसाठी सरसावली आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही जिल्हावासीयांना मदतीचे आवाहन केल्यानंतर दैनंदिन जीवनातील किराणा साहित्य तसेच विविध स्वरूपात मदत गोळा करून ती साकेगाव, ता.भुसावळ येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या टीमद्वारे रवाना करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, नगरसेवक प्रा.डॉ.सुनीलजी नेवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, प्रदेश सदस्य शकील पटेल, युवक जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच विजय पाटील, विकास सोसायटी चेअरमन किशोर भोई, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, विलास ठोके, चंद्रकांत कोलते, अजय चौधरी, प्रमोद पाटील, विनोद पवार, गजानन पवार, बाळू पाटील, मंगेश पाटील, युवक शहर उपाध्यक्ष राहुल वाघ, तुषार हळप, अमोल मांडे तसेच असंख्य कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !