खिरोद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मोफत हेल्मेट वाटप
सावदा : जनता शिक्षण मंडळाच्या सभागृहात शनिवारी सकाळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा झाला. सुमारे 225 पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर होत्या. पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाहीमध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी रावेरचे दिलीप वैद्य व सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव तर मूकनायक पुरस्कार देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना देवून गौरवण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांना पुरस्कार वितरण व पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप मंत्री यशोमती ठाकूर व आमदार शिरीष चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील आमदार, विनायकराव देशमुख, अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि.प.सदस्य सुरेखा पाटील, प्रवीण सपकाळे, किशोर रायसाकडा, प्रदीप गायके, डिगंबर महाले आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले तर सूत्रंचालन प्रा.दिलीप सोनवणे तसेच आभार रावेर तालुक्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकार्यांनी विशेष परीश्रम घेतले.



