भुसावळातील प्रभाग 13 मध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील डी.एल.हिंदी हायस्कूल, फालक नगर ते सरस्वती नगराला जोडणार्‍या अंतर्गत रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ रविवारी आमदार संजय भाऊ सावकारे आमदार यांच्याहस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक राजेंद्र दत्तू आवटे यांच्या सततच्या पाठपुराव्याने काम होत असल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
कार्यक्रमानंतर उपस्थित आमदारांसह नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते फालक नगर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश गुंजाळ, निकी बत्रा, गिरीश महाजन, अजय नागराणी, मेढे, वीरूभाई चांडाले, सुलेमान तडवी, घनश्याम भाई, विकास धारबडे, ललितकुमारजी मुथा, वेदजी ओझा, वसंत गोसावी, मुकेश बथेल, अमन तडवी, बी.एम.कच्छप, मंदार बनसोडे, मनोज पंडित, पणालाल यादव, दीपक गव्हाळे, विकी मेढे, जावेद तडवी, शुभम अहिरे, किशोर टोके, अंकुश वावरे, लाजरस मनी, गौरव आवटे व प्रभागातील नागरीक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !