श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग अध्यक्षपदी निखील राजपूत
भुसावळ : भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते निखील राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. करणी सेनेचे राष्ट्रीय संस्थापक, अध्यक्ष सुकदेवसिंग दादा गोगामेडि हे महाराष्ट्र दौर्याप्रसंगी भुसावळात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. यावेळी गोगामेडि यांनी निखील राजपूत यांचीराष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग अध्यक्षपदी निवड केली.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्जुनसिंह ठाकूर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेने दिलेली जवाबदारी पूर्णपणे निष्ठेने पार पाडावी तसेच संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे निवड पत्रात नमूद करण्यात आले. निखील राजपूत यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर समाजातील विविध मान्यवरांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




