महाराष्ट्रातील 12 निसर्ग व पर्यावरण प्रेमींंना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान


एकाच दिवसात 31 हजार झाडे लावणार्‍या नाना पाटील यांचाही सन्मान

भुसावळ : वर्ल्ड वाईल्ड प्लांटेशन वृक्षारोपन कार्यात उष्कृष्ठ कार्य केल्याची दखल घेत महाराष्ट्रातील 12 निसर्ग व पर्यावरण प्रेमींंना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डेप्युटी सेक्रेटरी म्रिंगका अचल, बशीर अहमद राजदूत (जकार्ता इंडोनेशिया), पद्मश्री प्राप्त कवी सत्येंद्र शर्मा, पद्मश्री प्राप्त के.एस.रावत, आय.ए.एफ एअर कंमाडर डॉ.अश्मीदर बहल, भारतीय आर्मीचे मेजर जनरल विक्रम देव डोग्रा, रेडीओ मेरी आवाजचे सीईओ अमित चौधरी, शैक्षिक आगाजच्या संस्थापिका स्मृर्ती चौधरी, लिटल हेल्पच्या संचालिका समृद्धी चौधरी, ओमानहून मीनल देवरा यांची उपस्थिती होती. लोकगीत गायिका प्रभा जोशी यांनी लोक गीत सादर केले.




31 हजार झाडे एकाच दिवसात लावली
नंतर स्मृती चौधरी यांनी विविध राज्यातील व परदेशातील टिम लिडर्स यांची ओळख करून देतांना वर्ल्ड वाईड प्लांटेशन कार्यात एक लाख तेरा हजार झाडे लावण्याच्या कार्यात नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात जास्त महाराष्ट्राने 31 हजार झाडांचे वृक्षारोपण एकाच दिवसात करण्यात आल्याने महराष्ट्र टिमचे विशेष कौतुक करण्यात आले. यात वृक्षमित्र आबासाहेब मोरे नगर, रानमळा पॅटर्नचे वनश्री प्राप्त पी.टी.शिंदे अण्णा, राज्य समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच व वर्ल्ड वाईड प्लांटेशन महाराष्ट्र टिम लिडर नाना पाटील (भुसावळ), प्रियवंदा तांबोटकर (रायगड), जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील (जळगाव), स्वाती धोटकर (चंद्रपूर), दीपा गिरी (नांदेड), सुमन जीरोनेकर (नांदेड), सुरेंद्रसिंग पाटील (भुसावळ), सत्येंद्र पांडे (पुणे), सेलिना अहमद (नागपूर), अलका भटकर (जळगाव) या सर्वाना पर्यावरण मित्र पुरस्कार मान्यवराच्या उपस्थित ऑनलाईन देण्यात आले. ओमानच्या मीनल देवरा यांनी आभार मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !