वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व निवडणुका ताकदीनिशी लढवणार
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे : कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह
भुसावळ : आगामी नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे व यापुढे जो कार्यकर्ता काम करेल त्यालाच पदावर राहता येईल, असा स्पष्ट इशारा पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिला. वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका व शहर कार्यकारीणी बैठक शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच झाली. यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष कोळी, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, कामगार आघाडी चिटणीस बालाजी पठाडे, जिल्हा संघटक सचिव सचिन वानखेडे, तालुका सचिव जितेंद्र सुरवाडे, भुसावळ तालुका कोषाध्यक्ष संदीप सुरवाडे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, स्वप्नील सोनवणे, रुपेश कुर्हाडे, निलेश जाधव, विजया वानखेडे, वंदना अनंत सोनवणे, वंदना आराक, शोभा सोनवणे, संगीता तायडे, मीरा वानखेडे, कविता वाघ, मीना भालेराव, भावेश सूर्यवंशी, अमोल इंगळे आदी पदाधिकारी व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे यांनी तर आभार भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी मानले.



