क्रांतीदिनानिमित्त वरणगावात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार


आजी-माजी सैनिकांना पालिका करातून दिलासा मिळण्यासाठी प्रयन करणार : राजेंद्र चौधरी

वरणगाव : भुसावळ तालुका व वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीतने देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र परीश्रम घेणार्‍या आज-माजी सैनिकांचा क्रांती दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवट संपताच सर्व आजी-माजी सैनिकांना वरणगाव नगरपरीषदेच्या घरपट्टी-पाणीपट्टी सारख्या सर्व करांपासुन मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी सैनिक राजेंद्र बाबूराव माळी, पांडुरंग महादेव सातव, अशोक शिवराम माळी, दीपक रमेश मराठे, कैलास त्रंबक माळी, पंकज संतोष सुर्यवंशी, सुधीर सुकदेव वाघोदे, संजय शिवाजी बावस्कर, उल्हासराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी महिला शहराध्यक्ष रंजना पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पूभाई जकातदार, माजी नगरसेवक रवींद्र सोनावणे, माजी नगरसेवक साजीद कुरेशी, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे,शहरउपाध्यक्ष कैलास माळी, युवक तालुका उपाध्यक्ष सागर सरोदे, कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, अहमद भाई कुरेशी, महेश सोनावणे, ओबीसी सेल चिटणीस प्रशांत बोंडे, दिलीप गायकवाड, अनिल चौधरी, शे.रीजवान भाई, इफ्तेखार मिर्झा, रवींद्र पाटील, शेख एहसान अहमद, शेख आसीफ भंगारवाले, शोहब खाटीक, अमजद खान, अजीज भाई जकातदार, अमोल चौधरी, योगेश चौधरी, निवृत्ती माळी, संदीप ठाकुर, राजु चौधरी, भागवत पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !