राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत विविध पदाधिकार्‍यांची निवड


भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत भुसावळातील राष्ट्रवादी कार्यालयात भुसावळ तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. प्रसंगी त्यांना निवडपत्र देण्यात आले. त्या प्रा.भागवत छबिलदास पाटील (वरणगाव) यांची भुसावळ पदवीधर संघ सेलच्या तालुकाध्यक्षपदी तर भुसावळ ज्येष्ठ नागरीक संघ भुसावळ तालुकाध्यक्षपदी तुकाराम सखाराम बावस्कर तसेच मागासवर्गीय सेल भुसावळ तालुकाध्यक्षपदी जयराज बसराज पवार, व्हीजेएनटी भुसावळ तालुकाध्यक्षपदी अतुल कडू पाटील, सामाजिक न्याय विभागाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी रुपेश रमेश चौधरी, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षपदी नामदेव पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, रवींद्र सोनवणे, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, कैलास माळी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !