पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा राजपूत समाजातर्फे कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान


भुसावळ :  कोरोनाच्या कठीण काळात गेल्या दोन वर्षापासून पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून इमाने-इतबारे जनसेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहे. भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनीदेखील अलीकडच्या काळात भुसावळचा पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावत व जागतिक महामारीत स्वतःच्या जीवाची काळजी न करता मानवता सेवाधर्म हे एकच उद्दिष्ट मनाशी बाळगत निस्वार्थी सेवा बजावल्याने या कार्याची दखल घेत त्यांचा राजपूत समाजातर्फे मंगळवारी कोव्हीड योद्धा म्हणून गौरवण्यात आले. श्री राजपूत करनी सेनेचे कोव्हिड योध्दा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना छोटेखानी कार्यक्रमात गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राजपूत समाज भूषण योगेंद्रसिंह पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंह चव्हाण, उद्योजक लीलाधर भोळे, पत्रकार हर्षल पाटील, किशोर सावळे, अभिजीत पाटील तसेच राजपूत समाजबांधव उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !