भुसावळातील नगरसेवक मुकेश पाटील यांनी केला फ्रंट लाईन वर्करांचा ‘शूर विरांगणा’ व ‘देवदूत’ पुरस्काराने सन्मान


कोरोनाच्या कठीण काळात जीवाची बाजी लावून काम करणार्‍यांच्या कार्याची दखल

भुसावळ :  2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातल्यानंतर अशा कठीण काळात नागरीकांच्या सेवेसाठी अहोरात्र डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी आशा वर्कर तसेच पोलीस प्रशासन जीव धोक्यात घालून झटत असल्याची दखल घेत फ्रंट लाईन वर्करांचा भुसावळातील नगरसेवक मुकेश पाटील यांनी ‘शूर विरांगणा’ व ‘देवदूत’ पुरस्कार देवून सन्मान केला. देवदूतांप्रती कृतज्ञता व्यक्ती करण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या फ्रंटलाईन वर्करांसह शहरातील विविध रुग्णालयात कार्यरत णकूण 175 फ्रंटलाईन वर्करांचा सन्मान करण्यात आला.

यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
शहरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमास भुसावळ नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नगरसेवक मुकेश नरेंद्र पाटील, नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप जैन, डॉ.आतीया खान, डॉ.उज्वला भंगाळे, डॉ.तौसीफ खान, आशा वर्कर, परीचारीका, कोविड सेंटरमधील डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.




आपणंही लागतो समाजाचे देणं : मुकेश पाटील
कोरोनाच्या कठीण काळात आपले घर-दार, कुटुंब व मूलबाळ सोडून नागरीकांसाठी अहोरात्र सेवा देणार्‍या फ्रंट लाईन कर्मचार्‍यांच्या कार्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच असल्याचे यावेळी नगरसेवक मुकेश पाटील म्हणाले. आपणही समाजाचे देण लागतो या भावनेतून 175 फ्रंट लाईन वर्करांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !