गिरडगाव जवळून आयशर वाहनाची चोरी
यावल : तालुक्यातील गिरडगाव जवळ डिझेल संपले असल्याने रस्त्याच्या कडेला लावलेले आयशर वाहन चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ईश्वर दिलीप लोधी (साकळी, ता.यावल) यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री ते त्यांचे आयशर वाहन (क्रमांक एम. एच. 04 जी. आर.6497) जळगाव येथून विदगावमार्गे साकळी जात होते मात्र गिरडगाव गावाजवळ रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वाहनाचे डिझेल अचानक संपल्याने व डिझेलसाठी पैसे नसल्याने वाहन गिरडगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला लॉक करून लावण्यात आले होते मात्र मंगळवारी सकाळी आठ वाजता वाहन नेण्यासाठी गेले असता वाहन आढळले नाही. अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने वाहन नेण्यात आल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस करीत आहेत.




