पैसे न दिल्याने बालकावर चाकू हल्ला : यावलमध्ये संशयिताला चोपले


यावल : बालकाने पैसे न दिल्याने 12 वर्षीय बालकावर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना शहरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकारानंतर संतप्त जमावाने संशयीतास चांगलेच चोपून काढले. शहरातील बाबूजीपूरा खाटीक वाडा भागात मंगळवारी रात्री 8.45 च्या सुमारास सय्यद तलाह अब्दुल अव्वल (12) हा बालक पाचशे रुपयांची नोट घेऊन किराणा साहित्य घेण्यासाठी जात होता. यावेळी आरीफ रशीद खाटीक (38) याने सय्यदच्या हातातून पाचशेची नोट हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्याचा राग आल्याने आरीफ खाटीकने बालकाच्या पाठीवर चाकूने हल्ला चढवला. यानंतर सय्यद हा रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. ही माहिती मिळताच जमलेल्या गर्दीने आरीफ खाटीक यास बेदम चोप दिला. बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ.अक्षय लांडगे, मंजूषा कोळेकर, विजय शिंदे यांनी उपचार केले. त्यात बालकाच्या पाठीवर आठ टाके पडले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जमावाच्या हल्ल्यातून जखमी आरीफला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अब्दुल अव्वल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !