रावेरात वंचित बहुजन आघाडी स्वातंत्र्यदिनी आंदोलन छेडणार


रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मनमानी कारभाराचा निषेध

रावेर : वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने बुधवारी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन देण्यात आले. सोमवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता वंचित बहुजन आघाडीचे सातपदाधिकारी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी निवेदन स्वीकारण्यास मनाई केली. केवळ पाच लोक असतील तेव्हाच निवेदन घेईल अन्यथा निवेदन घेणार नाही, असे सांगत कॅबीन बाहेर जाण्यास त्यांनी सांगितल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निलंबीत करण्यात यावे अन्यथा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने रविवार, 15 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार असून होणार्‍या परीणामास तहसीलदार व शासन जबादार राहील याची शासनाने नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद आहे.




यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस दिनेश इखारे,, रावेर वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा कामगार नेते बालाजी पठाडे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शाह, रावेर तालुका उपाध्यक्ष विनोद तायडे, रावेर तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, रावेर तालुका सचिव अर्जुन वाघ, रावेर शहर उपाध्यक्ष इम्रान शेख, रावेर शहर सचिव दौलत अढांगळे, फैजपूर शहर सचिव सोनु वाघूळदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !