रावेरची शांतता भंग करणार्यांची गय नाही : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मुढे
रावेर : मोहरमनिमित्त सार्वजनिक मिरवणुकीला परवानगी नसल्याचे सांगत शांतता भंग करणार्यांची गय करणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुढे यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिला. मोहरम सणानिमित्त येथील रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.मुंढे यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डीवायएसपी विवेक लावंड, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते.



यांची बैठकीला उपस्थिती
डॉ.मुंढे यांचा राजकीय पक्ष, विविध संघटनांनी तसेच उपस्थित मान्यवरांचा एपीआय शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे, उपनिरीक्षक अनिस शेख यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, सीईओ रवींद्र लांडे, इमाम गयासोद्दीन, पद्माकर महाजन, अयूयूब पहेलवान यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला नगरसेवक आसीफमोहम्मद, सादिक शेख, दिलीप कांबळे, पद्माकर महाजन, कांता बोरा, कल्पना पाटील, महेमूद शेख, अशोक शिंदे, पंकज वाघ, शेख गयास, सुवर्णा भागवत यांच्यासह शांतता समिती सदस्य, हिंदू सेवा संघटना, मुस्लिम पंच कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

