संतापजनक ! : नको त्या अवस्थेत पाहिल्याने आईने प्रियकराच्या मदतीने केली मुलाची हत्या


नवी दिल्ली : प्रियकरासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून मुलाची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात घडली. आजोबांच्या मनात नातवाच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर या प्रकाराचा भंडाफोड झाला. या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला गजाआड केले आहे.

शवविच्छेदनानंतर हत्येचा उलगडा
समनापूर ठाणे हद्दीतील एका गावात 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती मात्र सोनू नावाच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला व त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारदेखील उरकण्यात आले. सोनूच्या आजोबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी हत्येचा संशय व्यक्त करताच पोलिसांनी कोर्टाची परवानगी घेऊन अल्पवयीन मुलाचा जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यात सोनूचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं सिद्ध झालं. सोनूच्या डोक्यावर एक मोठा घाव दिसून आला. सोनूच्या आईची चौकशी केली आणि सारं रहस्य उलगडला. पोलिसांनी आरोपी आईच्या प्रियकरालाही अटक केली. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिली. मुलानं प्रियकरासोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिल्यानं आई आणि प्रियकरानं मिळून मुलाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या डोक्यावर दोघांनीही लाकडाच्या ओंडक्यानं जोरदार हल्ला केला आणि यातच मुलाचा मृत्यू झाला. दोघांनी मिळून मुलगा सोनू याचा मृतदेह जमिनीत गाडला होता.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !