दिड लाखांची लाच भोवली : होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्यांसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात


नाशिक : तक्रारदाराच्या मुलीचे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देण्यासाठी एक लाख 47 हजार 500 रुपयांची लाच मागणार्‍या वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर येथील होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (52) व कॉलेजचे लिपिक भारती बापुसाहेब इथापे (34) यांना लाच स्वीकारताच अहमदनगर एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. झोडेगाव, ता.गंगापूर येथील 49 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून हा सापळा यशस्वी करण्यात आला. दोघा आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
अहमदनगर एसीबीचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हवालदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे आदींनी हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !