पत्नीसह मुलाच्या आत्महत्येनंतर पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
केंदुर : साडेचार वर्षाच्या मुलासह मातेनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिरूर तालुक्याच्या करंदी येथे घडली. घटनेनंतर महिलेच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसलेतरी तणावातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मोनिका भगवान चंद्रावळे (30) व साई उर्फ ऋषी भगवान चंद्रावळे (4) अशी मयतांची नावे आहेत. दरम्यान, मयत मोनिका यांचे पती भगवान चंद्रावळे यांनी देखील आत्महत्याचा प्रयत्न केला. भगवान यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
