शाळेत कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षकाचे निधन


यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिरातील 30 वर्षीय शिक्षकाचे शाळेत कर्तव्यावर असतांना ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. प्रवीण सुधाकर राणे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील रहिवासी तथा ज्योती विद्या मंदिरातील शिक्षक प्रवीण सुधाकर राणे (30, मूळ रहिवासी रा.कोळवद, ता.यावल) हे शुक्रवारी कर्तव्यावर असतानाच दुपारी 2.45 वाजता अचानक ह्रदयविकाराचा झटका आला व त्यांना तातडीने उपचाराकरीता रुग्णालयात आणण्यात आले मात्र उपचारापूर्वीचे त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलिसात सुरेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !