वरणगावात शिवसेनेतर्फे नागपंचमीनिमित्त सर्प मित्रांचा सत्कार
वरणगाव : नागपंचमीनिमित्त वरणगावसह परीसरातील सर्प मित्रांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान समाधान महाजन सर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, धनगर समाजाचे अध्यक्ष शामराव धनगर, कार्यालय उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, मुस्लिम समाजाचे नेते जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपशहर प्रमुख सुकदेव धनगर, निलेश ठाकूर, राजू धनगर, श्रीराम धनगर, नितीन पाटील, विनायक माळी, कृष्णा पुजारी, कुणाल महाजन, राहुल बंजारी, सागर वंजारी, सुनील शिंदे, अतुल पाटील, कृष्णा पाटील, राजू परसे, साजिद शेख, रोहित मुळे, योगेश भोई, सतीश चौधरी यांच्यासह शिवसेना परिवारातील सदस्य उपस्थित होते.



