मानव जातीच्या कल्याणासह बळीराजाला यावे सुगीचे दिवस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नागपंचमीदिनी महादेवाला साकडे
वरणगाव : मानव जातीच्या कल्याणासह बळीराजाला सुगीचे दिवस, असे साकडे नागपंचमीच्या दिवशी महादेवाला साकडे घालून करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर काही भागंत दुष्काळजन्य परीस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भीती आहे. या अनुषंगाने पवित्र श्रावण महिन्याचा पहिला सण नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर महादेवाची मनोभावे आराधना व अभिषेक करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पूभाई जकातदार, शहराध्यक्षा रंजना पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेविका प्रतिभा चौधरी, रोहिणी जावळे, प्रतिभा सोनवणे, वैशाली मराठे, निर्मला शेळके, श्रद्ध गायकवाड, उषा तावडे, वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपशहराध्यक्ष कैलासराव माळी, तालुका सरचिटणीस राजेश पंडीत चौधरी, मिलिंद महाजन, महेश सोनवणे, विकास सोनवणे, जितेंद्र तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



