धुळे जिल्हा परीषदेतील लाचखोर कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


जीपीएफ फंडाचा परतावा करण्यासाठी स्वीकारली पंधराशे रुपयांची लाच

धुळे : जीपीएफ फंडाचा परतावा करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणार्‍या धुळे जिल्हा परीषदेच्या अर्थ विभागातील लाचखोर कनिष्ठ सहाय्यकास धुळे एसीबीच्या पथकाने लाच घेताना अटक केल्याने जिल्हा परीषदेत प्रचंड खळबळ उडाली आहे. विलास मधुकर पाटील (36, रा.प्लॉट नं.12, गट नं. 12, दांडेकर नगर, पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जिल्हा परीषदेतील 36 वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या जीपीएफ फंडातून 50 हजारांचा परतावा मंजूर करण्यासाठी प्रकरण सादर केल्यानंतर अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक विलास मधुकर पाटील (36, रा.प्लॉट नं.12, गट नं. 12, दांडेकर नगर, पिंप्राळा, जळगाव) यांनी 1 ऑक्टोबर रोजी एक हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार करताच सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
धुळे एसीबीचे पोलीस उपअअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !