लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर पोलीस कोठडीत


नाशिक : नाशिकच्या लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर त्यांना सुरूवातीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची (सोमवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरीता त्यांच्या शासकीय वाहन चालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र त्या एसीबीच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली हाती.

आठ लाखांची लाच स्वीकारताना दोघांना झाली होती अटक
सोमवारी नाशिकच्या जिल्हा परीषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहन चालकाने आठ लाख रुपयांची स्वीकारली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र रात्री सात वाजेनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही, या कायद्यातील नियमाचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी लिहून दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी पसार झाल्या होत्या. दरम्यान, वाहन चालकासह शिक्षकाने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !