कोरोनाच्या काळात 20 कोटी लोकसंख्या गेली दारीद्य्रात
अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुनगेकर : नाहाटा महाविद्यालयात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक विचारधारा’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक समानतेवर आधारलेला समाज तयार करावयाचा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे चार तत्व ते मानत व त्यांना कायद्याचे राज्य, संधीची समानता अभिप्रेत होती. देशातील सर्वच समाजाच्या राहणीमानात बदल झाले. औद्योगिक क्रांती झाली परंतु असे जरी असले तरी आजही भारतात बहुतांश लोक गरीबीत जीवन जगत आहेत. कोरोनाच्या काळात 20 कोटी लोकसंख्या दारीद्य्रात ढकलली गेली. जाती-पातीच्या भिंती उभ्या आहेत. आजही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले सरकार भारतात नाही ही खेदाची बाब असल्याचे अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुनगेकर येथे म्हणाले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्य विद्या शाखेतर्गत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर’ एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार झाले. याप्रसंगी ते बोलत होते
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन महेश फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, संस्थेचे संचालक संजय नाहाटा उपस्थित होते. उद्घाटक अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुनगेकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एन.ई.भंगाळे आदी उपस्थित होते.



महामानव विविध भाषांचे अभ्यासक डॉ.अंभोरे
प्रथम सत्रात डॉ. उत्तम अंभोरे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी जातीय व्यवस्था, मानवतावाद, मानववंशशास्त्र, बुध्दिवाद, भाषाशास्त्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आंबेडकर इंग्रजी, जर्मनी, पाली, गुजराथी, मराथी इत्यादी भाषांचे गाढे अभ्यासक असल्याचेही डॉ.अंभोरे म्हणाले. द्वितीय व समारोप सत्रात डॉ.फैज् अन्सारी (पारूल विद्यापीठ, वडोदरा) यांनी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून मानवी हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी मानविद्याशाखेतील डॉ.एस.पी.झनके, डॉ.पी.ए.अहिरे, डॉ.के.के.अहिरे, डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.प्रफुल्ल इंगोले, डॉ.किरण वारके, प्रा.पुरूषोत्तम महाजन, डॉ.मनोज पाटील, डॉ.राजेंद्र तायडे, प्रा.भारती सोनवणे, प्रा.प्रशांत पाटील आदींनी परीश्रम घेतले. तांत्रिक बाबींसाठी संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील यांचे सहकार्य लाभले.

