भुसावळात दशामातेची नमा शर्मा यांच्याकडे विधीवत स्थापना


जगातून कोरोनाच्या नायनाटासाठी दशामातेला साकडे

भुसावळ :  शहरातील कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे दशामातेचे आगमन झाले. यंदा उत्सवाचे पाचवे वर्ष असून शनिवारी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दशामातेचे आशीर्वाद धेतले. प्रसंगी जोडप्यांसह लहान बालकांना आमंत्रीत करून त्यांना दक्षिणा तसेच खेळणी व प्रसाद देण्यात आला. हिंदू संस्कृती टिकून रहावी व भावी पिढीला उत्सवाची परंपरा जोपासता यावी या दृष्टीने सुहासिनींना तुळशी रोप भेट देण्यात आले. यावेळी जगातून कोरोनाचा नायनाट व्हावा, पावसाचे संकट दूर व्हावे, असे साकडे दशामातेला घालण्यात आले. दरम्यान, श्री दशामातेचा उत्सव नवरात्रोत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. सकाळ-संध्याकाळी आरती, उपवास, भजन, जागरण केले जाते व रात्री 12 वाजता तापी नदीत विसर्जन केले जाते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !