भुसावळात उद्या रोटरी रॉयल्स करणार ‘सन्मान कर्तबगारांचा’


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स आणि उदिता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान रविवार, 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथील रोटरी भवनात करण्यात येणार आहे. शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी असतील. भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. उपस्थितीचे आवाहन भुसावळ रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव विनोद तायडे, उदिता कन्स्ट्रक्शनचे संचालक भुपेंद्र शर्मा व प्रकल्पप्रमुख गणेश फेगडे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !