गंभीर 16 गुन्हे दाखल असलेल्या हैदर अलीवर ‘एमपीडीए’


जिल्हाधिकार्‍यांची कारवाई : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात केले स्थानबद्ध

चाळीसगाव : जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा-पुन्हा गुन्हे करणार्‍या तसेच 16गंभीर प्रकारच्या गुन्हे दाखल असलेल्या चाळीसगावातील हैदरअली आसीफअली सय्यद (30, रा. पीर सालेम नगर, नागद रोड, चाळीगासव) या गुन्हेगारावर शनिवारी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हधिकार्‍यांची कारवाई
गतवर्षी त्याला 6 महिन्यांसाठी हद्दपार केले होते. त्यानंतर हैदरअली याच्या विरुद्ध मालेगाव येथील पवारवाडी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. हैदरअलीच्या विरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात यावी याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 13 ऑगस्ट रोजी हैदरअलीच्या एमपीडीए कारवाईचे आदेश पारीत केले.

नाशिक कारागृहात केलेे स्थानबद्ध
हैदरअली याच्या विरोधात चाळीसगाव शहर, ग्रामीण पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंग, अवैध शस्त्र बाळगणे, सार्वजनिक मालमत्तांना नुकसान असे एकूण 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने हैदरअली याला चाळीसगावातून अटक करुन त्याला नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !