होय, मुक्ताईनगरातून सेनेतर्फे इच्छुक -सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील


मुक्ताईनगर- मुक्ताईनगर विधानसभेसाठी सेनेतर्फे आपण इच्छूक असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. मातोश्रीकडून आपण मुक्ताईनगरची उमेदवारी सेनेतर्फे आपणास मिळावी या संदर्भात आपण मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

रावेरात लावली हजेरी
रावेर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार व आमदार हरीभाऊ जावळे यांनी सोमवारी आपणास दूरध्वनी करून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने उपस्थित राहण्याचे कळवले होते शिवाय भाजपाच्या पहिल्या यादीत आमदार जावळे यांचे नाव आल्याने आपण उपस्थित राहिल्याचेही त्यांनी सांगितले. मुक्ताईनगरात उपस्थित का नाही राहिलात? या प्रश्‍नावर त्यांनी खडसे यांच्याकडून कुठलाही फोन आपणास आला नसल्याचे त्यांनी सांगितले. 4 रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !