वृक्षसंवर्धन काळाची गरज : प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे
भुसावळ शहर पत्रकार संस्था, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे वृक्षारोपण
भुसावळ : दिवसागणिक तापमानात वाढ होत असून पर्यावरणाचा र्हास होत आहे. अश्या परीस्थितीत वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे यासाठी वृक्ष रोपणासह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरीकांनी याची दखल घ्यावी व वृक्षसंवर्धनाकरीता झाडे लावावी, असे आवाहन भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणेे यांनी केले. येथील भुसावळ शहर पत्रकार संस्था आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्यातर्फे नाना पाटील यांच्या आई स्व.वैजंताबाई शंकर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात 15 रोपांची ट्री लावून लागवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी गुळवेल, सिसम यासह विविध रोपांचे रोपण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.



यांची होती उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, पत्रकार उज्वला बागुल, राकेश कोल्हे, प्रदीप पाटील, राजेश तायडे, कलीम पायलट, कमलेश चौधरी, संतोष शेलोडे, सुनील आराक, गोपी म्यांद्रे, सतीश कांबळे, विनोद गोरधे, सद्दाम खाटीक, रमेश खंडारे, अखिलेश धिमान ,मनीषा शिरतुरे, प्रतिभा लोहार, शुभांगी यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य समन्वयक नाना शंकर पाटील, महिला पर्यावरण सखी मंच महाराष्ट्र, रघुनाथ आप्पा सोनवणे, सुरेंद्रसिंग पाटील, जी.आर.ठाकूर (मामा), पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नाना पाटील तर आभार प्रेम परदेसी यांनी मानले.

