घराबाहेर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवली


चाळीसगाव : शहरातील धनगर गल्लीतील रहिवासी प्रदीप उत्तमराव आगोणे (41) यांची घरासमोर लावलेली दुचाकी (क्र. एम.एच.19 सी.एल 1951) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना रविवार, 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आगोणे यांनी परीसरात शोधाशोध केली असता 30 हजार हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून न आल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !