आईनेच केली मुलाची हत्या
नवी दिल्ली : जन्मदात्या आईनेच आपल्या लेकाची हत्या करून ’त्याला’ घरातच पुरल्याची भयंकर घटना हरियाणाच्या रोहतकमध्ये घडली. मुलाच्या काकाने मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर हा प्रकार समोर आला आहे. आई आणि लहान भावाला याप्रकरणी अटक करण्यात आली. कर्मपाल उर्फ राहुल असं हत्या झालेल्या 22 वर्षीय मुलाचं नाव होतं. दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्याची हत्या करून त्याला पुरण्यात आलं होतं. राहुलला भेटण्यासाठी ते त्याच्या घरी आले तेव्हा घरातील एका रुमला नवीन फरशी बसवण्यात आली होती.. यामुळे आत्या आणि काकाला घातपाताचा संशय आला. त्यांनी मुलाच्या आईविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या आईला आणि भावाला अटक केली.
