वयोवृद्धाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव : 65 वर्षीय वयोवृद्धाने गोठ्यात गळफास घेतल्याची घटना शहरातील तांबापूरा भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. अशोक कौतीक हटकर (65) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मुलगा दुध काढण्यासाठी गोठ्यात गेला असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान, अशोक हटकर यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली ? याची माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.



