महाराष्ट्रात पाच कोटींवर नागरीकांना लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहापर्यंत सहा लाख 8 हजार नागरीकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या पाच कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. 14 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 9 लाख 64 हजार 460 नागरीकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरीकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी वर्तविली.
