मोठी बातमी : मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर 20 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


मुंबई : मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ.डी.एल.एन.मूर्ती हे 20 लाखांच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पांतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिसचे जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे कंत्राट मिळाले होते. ऑगस्ट 2020 रोजी कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. ठरल्याप्रमाणे कामाचे बिल दोन कोटी 10 लाख तसेच 22 लाख गॅरंटी रक्कम अदा करण्यात होती. त्यापैकी, 40 लाख रूपयांचे बिल आणि 11 लाख गॅरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकडे थकीत होती. मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वताकडे अडकवून 20 लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

मूर्ती यांच्या अडचणीत वाढ
गत महिन्यात 2 जुलै रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान. मूर्ती यांच्या मालमत्तेची कुंडलीही एसीबीकडून काढण्यात येत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !