17 वर्षीय तरुणीवर बलात्कार : नराधमाला अटक


राजगुरूनगर : 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला मात्र पीडीतेने बदनामीपोटी वाच्यता केली नाही मात्र पीडीता गर्भवती राहिल्याने या बाबीचा उलगडा झाल्यानंतर 44 वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश वामन सपाट (44, रा.कमानची सपाटवाडी ता.खेड) असे गुन्हा दाखल संशयीताचे नाव आहे. आरोपीने खेड तालुक्यातील चास येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केला होता. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान चास येथे ही घटना घडली होती. मुलीची आई घरात नसताना गणेश वामन सपाट हा घरात जाऊन पीडीत मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार, अत्याच्यार करत असे. तीन वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे मुलीला त्रास होऊन गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. गणेश सपाट याला पोलिसांनी अटक केली असून 7 दिवसाची न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !