खारेपाडा येथे 25 वर्षीय विवाहितेची विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या
शिरपूर : तालुक्यातील खारेपाडा येथे 25 वर्षीय विवाहितेने मंगळवारी सकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. तत्पूर्वी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलेस दाखल केले असता महिलेचा मृत्यू झाला.
लालबाई मुकेश पावरा (25, रा.खारेपाडा, पो.टेंभेपाडा, ता.शिरपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिलेचे सलाईपाडा येथील माहेर आहे.लालबाई मुकेश पावरा हिने आपल्या राहत्या घरात काही तरी न विषारी औषध प्राशन केल्याची बाब सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने महिलेच्या जेठ आणि गावातील नातेवाईक कैलास पावरा, अर्जुन पावरा ,आनंदा पावरा यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना महिलेचा दुपारी मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.




