धक्कादायक ! : पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ एकाने पेटवून घेतले


पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात एकाने पेटवून घेऊन आयुक्तालयाकडे धाव घेतल्याने बुधवारी सकाळी 11.30 वाजता मोठी खळबळ उडाली. गेटवरील कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी या व्यक्तीला वाटेतच अडवून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एकाने स्वत:ला पेटवून घेऊन आतमध्ये धावत जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून गेटवर एकच गोंधळ उडाला. जवळच उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस व इतरांनी त्या व्यक्तीला अडवून आग विझविली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकारात ही व्यक्ती गंभीररित्या भाजली आहे. मात्र, त्याच्याविषयी अधिक माहिती मिळाली नाही. बंडगार्डन पोलीस अधिक माहिती घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !