लाचखोर पोलिसाला भोवली दोन हजारांची लाच : एसीबीची कारवाई


अकोला : एमपीडीए कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. कान्हेरी सरप येथील 30 वर्षीय तक्रारदार यांना दारू विक्री करू देण्यासाठी तसेच एमपीडीए कारवाई टाळण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अरुण गावंडे याने लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन दोन हजार रुपये लाच देण्याचे कबूल झाले, मात्र तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपी लोकसेवक अरुण गावंडे यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !