भुसावळात वैतागवाडीत छापा : दोन महिलांसह एकाला अटक


भुसावळ : शहरातील वैतागवाडी भागात पोलिसंनी गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकत दोन महिलांसह एक पुरूषाला ताब्यात घेतले. गुरूवारी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, एलसीबीचे पोलिस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथकातील पोलिस कर्मचार्‍यांनी छापा टाकल्याने खळबळ उडाली. दोन महिलांसह एक पुरूष अश्लिल चाळे करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !