भुसावळातील अमृत योजना कामाला गती मिळण्याबाबत पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांना साकडे


भुसावळ : भुसावळात मंजूर असलेल्या अमृत योजनेचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती मिळण्यासह विविध प्रश्‍न सुटण्यासंदर्भात मुंबई पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भुसावळ नगराध्यक्षांसह 12 नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी साकडे घातले. याप्रसंगी शिष्ट मंडळाने माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचीदेखील सदिच्छा भेट घेण्यात आली.

मुंबईत शिष्टमंडळाने घेतली भेट
भुसावळातील शिष्ट मंडळाने मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरूवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी भुसावळ पालिकेतील विविध अडचणी तसेच प्रलंबित प्रश्‍नांबाबत व अमृत योजनेच्या संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्र्यांकडे प्रसंगी निधीची मागणी करण्यात आली. जलसंपदा मंत्री पाटील यांनी पालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत अमृतप्रश्‍नी बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.




यांचा शिष्टमंडळात सहभाग
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, अमोल इंगळे, दत्तू सुरवाडे, दिनेश नेमाडे, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !