आईची महती महान : हभप नितीन महाराज
सावद्यात भर पावसातही कीर्तनात भाविक भक्तीरसात चिंब
सावदा : आईची महती महान असून अनेक संतानादेखील ती शब्दात सांगता आलेली नाही, असे विचार मलकापूर येथील ह.भ.प.नितीन महाराज यांनी येथे कीर्तनात व्यक्त केले. सावदा येथे सोमवार, 16 रोजी माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आईच्या महती विषयावरील कीर्तन सुरू झाल्यावर दडी मारून असलेल्या पावसानेही हजेरी दिली व त्यात कीर्तनकारांसह भाविकही दंग झाले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, त्यांचे पूत्र माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, शेखर वानखेडे, चारुदत्त वानखेडे, राजेश कोल्हे, फैजपूर येथील नगरसेवक शेख कुर्बान तसेच राजेंद्र भारंबे हे भर पावसातही भक्तीरसात चिंब भिजले.




