राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजीतसिंग राजपूत यांचा भुसावळातील राजपूत समाजातर्फे गौरव
भुसावळ : देशातील युवा श्रेत्रात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानल्या जाणार्या ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ केंद्र सरकारद्वारे 12 ऑगष्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय युवक कल्याण एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने भुसावळातील रणजीतसिंग राजपूत यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भुसावळ शहर व राजपूत समाजासाठी ही भूषणावह बाब असल्याने भुसावळातील राजपूत समाजबांधवांनी शासकीय विश्रामगृहात गुरुवारी रणजीतसिंग राजपूत यांचा गौरव करीत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यांची सत्कार प्रसंगी उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निखील राजपूत, दामोदर राजपूत, दलजीत राजपूत, गोपी राजपूत, नितीन पाटील, सोनी ठाकूर, संजय राजपूत, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, हर्षल राजपूत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



