अग्रवाल महिला मंडळातर्फे तीज महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
भुसावळ : भुसावळातील अग्रवाल महिला मंडळातर्फे हरीयाली तीज शहरातील हॉटेल राधाकृष्णमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. तीज महोत्सवात महिला मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सोबतच तीज निमित्त श्रावणाचे झुले खेळण्याचा महिलांनी घेतला. हरीयाली तीज सणानिमित्त अग्रवाल महिला मंडळातर्फे कोरोना काळातील अनुभव यावर वक्तृत्व स्पर्धा तसेच एका मिनिटात महादेवाचे नाव सांगणे, संगीत खुर्ची, मिसेस तीज ब्युटी, हाऊजी, एक मिनिट गेम अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमध्ये अग्रवाल सखींनी उत्साहाने भाग घेतला आणि बक्षिसे जिंकली. अध्यक्षस्थानी महिला मंडळ अध्यक्षा शीतल राजेश अग्रवाल होत्या. सेक्रेटरी नेहा शाम अग्रवाल उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी प्रतिभा विलास पाटील होत्या. कल्पना टेमानी, नंदा अग्रवाल, सरीता अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, संगीता अग्रवाल, निकिता अग्रवाल, विद्या अग्रवाल यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रूपा दीपक अग्रवाल यांनी केले.




