पाणलोट क्षेत्रात विपूल पाऊस : हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले


तापी नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता धरणातून तापी नदीपात्रात 40 हजार 894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरे-ढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगावतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !